इनफिनिक्सचा झिरो फाईव्ह स्मार्टफोन लाँच


हाँगकाँगच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनी इनफिनिक्सने त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन इनफिनिक्स झिरो फाइव्ह नावाने बाजारात आणला असून २२ नोव्हेंबरपासून भारतात फ्लिपकार्टवर तो विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनची दोन व्हेरि्यंट आहेत. ६ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १७९९९ रूपये आहे तर १२८ जीबी इंटरनल स्टोरेज फोनची किंमत १९९९९ रूपये आहे.

रिअर साईडला ड्युल कॅमेरा सेटअप ही या फोनची खासियत आहे. फोनला १२ व १३ एमपीचे दोन कॅमेरे दिले गेले असून फ्रंटला १६ एमपीचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. ५.९८ इंची फुल एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन, अँड्राईड नगेट ७.१ अशी फिचर्स असलेल्या या फोनची बॅटरी ४३५० एमएएच ची आहे. हा फोर जी व्होल्ट फोन असून तो थ्रीजी, वायफाय, जीपीएस, यूएसबी टाईप सी ला सपोर्ट करतो.

Leave a Comment