भारतीय अर्थव्यवस्थेवर ८०% जनता समाधानी- सर्वेक्षण


नवी दिल्ली – नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे समोर आले असून यात मोदी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे असल्याची बाब अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्सच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मोदी या सर्वेक्षणात ८८ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर ५८ टक्क्यांसह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (५७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

२,४६४ भारतीयांशी संवाद साधून प्यू रिसर्च संस्थेने सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण २१ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान करण्यात आले. उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये या कालावधीत निवडणुका सुरु होत्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल बहुतांश जनता समाधानी असल्यामुळेच मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे प्यू रिसर्च संस्थेने म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर दहापैकी आठ भारतीयांना चांगली वाटते, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. २०१४ नंतर हे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहे.

Leave a Comment