आजकाल धावणे असो, चालणे असो किंवा सायकलिंग असो.. व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो, तुम्ही तो किती वेळ केला आहे, तो व्यायाम केल्यानंतर किती कॅलरीज खर्च झाल्या आहेत, तुमचा आहार कसा असायला हवा, इत्यादी गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला सतत माहिती देणारी अॅप्स आता आपल्या मोबाईल फोन्स वर उपलब्ध आहेत. फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या व्यक्तींसाठी ही अॅप्स अतिशय फायदेशीर ठरत आहेत.
‘एंडोमॉन्डो’ हे फिटनेस अॅप सायकलिंग आणि रनिंग करणाऱ्या व्यक्तींकरिता अतिशय उत्तम अॅप आहे. हे अॅप तुमच्या चालण्याचा, पळण्याचा किंवा सायकलिंग साठी लागलेला वेळ अचूक सांगू शकते. या अॅप द्वारे तुम्ही तुमचा वर्कआउट मापू शकता. तसेच या अॅप द्वारे तुम्ही तुमच्या पुढील वर्क आउटचे ध्येय ठरवू शकता आणि तुमच्या मित्रमंडळींना ‘ टॅग ‘ देखील करू शकता. या अॅपमध्ये ऑडीयो ऑप्शनही आहे. या अॅप मध्ये तुम्ही केलेल्या सर्व वर्कआउटचे रेकॉर्ड्स सेव्ह होतात. ही रेकॉर्ड्स पाहून तुम्ही तुमचा पुढील वर्क आउट कसा असावा हे ठरवू शकता. या अॅप चा ‘ प्रीमियम ‘ व्हर्जन वैयक्तिक ट्रेनिंग ही देतो.
कॅलरी काऊंटर – माय फिटनेस पॅल हे अॅप ज्या व्यक्तींना फिटनेस सोबत खानपानाची देखील आवड आहे, अश्या व्यक्तींसाठी आहे. हे अॅप तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांमधून सेवन केल्या गेलेल्या कॅलारीज बद्दल माहिती देत असते. आरोग्यास हितकारक असे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देऊन तुमचा आहार नियंत्रित करण्याचे काम हे अॅप करीत असते. या अॅप मध्ये बारकोड स्कॅनर आहे, तुमच्या आहारामधील पोषक तत्वांचे मोजमापन करणारी यंत्रणा, तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करता येतील असे निरनिराळे खाद्यपदार्थ, तुम्ही दिवसभरामध्ये प्यालेल्या पाण्याचे प्रमाण या सर्व वस्तू ह्या अॅपद्वारे तुम्हाला अचूकपणे समजू शकतात. हे अॅप तुमच्या वजनात झालेली वाढ किंवा घटही दाखविते.
वर्कआउट ट्रेनर हे अॅप तुम्हाला तुमच्या वर्कआउट च्या योग्य पायऱ्या दाखविण्यास मदत करते. हे अॅप तुमचे प्रत्यक्षदर्शी मार्गदर्शक म्हणून काम करते. व्यायामप्रकार कुठलाही असो, हे अॅप त्या व्यायामप्रकाराची प्रत्येक स्टेप तुम्हाला सविस्तर समजावून सांगेल. ह्या अॅपमध्ये शरीर सुडौल बनविण्यासाठी अनेक वर्कआउट समाविष्ट केले गेले आहेत. तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब मोजणारे ही एक अॅप उपलब्ध आहे. ‘ इंस्टंट हार्ट रेट ‘ नावाचे हे अॅप तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब मॉनिटर करण्यास सहायक आहे. हे अॅप रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अचूक मोजणारे अॅप समजले जाते.
ही अॅप्स तुम्हाला फिट ठेवण्यास सहायक
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही