आता फक्त ९९ रुपयांमध्ये करा हवाईप्रवास ..!


नवी दिल्ली – तुम्हाला आता केवळ ९९ रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची इच्छा ४४४ रुपयांमध्ये पूर्ण करू शकता. या योजनेंतर्गत तिकीटांचे बुकिंग १९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

आता तिकीट बुक केल्यानंतर प्रवासी मलेशियन एअरलाइन्स कंपनी एअर एशिया मार्फत दिलेल्या या ऑफरनुसार मे २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान प्रवास करू शकतात व तिकीटांचे त्या कालावधीसाठी बुकींग करू शकतात. या तिकीट दराशिवाय प्रवाशांना किमान भाडे, विमानतळ शुल्क, टॅक्स, सरचार्ज आणि इंधन शुल्क वेगळे द्यावे लागेल.

तुम्ही बंगळुरु, कोच्ची, हैदराबाद, रांची, भुवनेश्‍वर, कोलकाता, नवी दिल्‍ली, गोवा आदी मार्गावर कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार ऑफरच्या माध्यमातून विमानप्रवास करू शकता. एअर एशिया इंडियाचे एमडी आणि सीईओ अमर अबरोल यांनी सांगितले, की लोक आताच ९९ रुपयांच्या किमान शुल्कात पुढच्या वर्षीच्या सुट्टयांचे नियोजन करू शकतात. ही एक प्रमोशनल ऑफर आअसून प्रवासी ज्याचा लाभ घेऊ शकतात. एअर एशियाने सांगितले आहे, की ग्राहक या ऑफरमध्ये केवळ कंपनीची वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीटांचे बुकींग करू शकतात.

Leave a Comment