‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ यादीत भारताचा १०० वा क्रमांक


नवी दिल्ली – जागतिक बँकेने भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचा दाखला दिला असून भारताचा जागतिक बँकेने जाहीर केलेल्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ यादीत १०० वा क्रमांक आहे. भारताचा मागच्यावेळी या यादीत १३० वा क्रमांक होता.

एकूण १९० देशांची यादी जागतिक बँकेने जाहीर केली आहे. २०१८ च्या इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स या आवृत्तीनुसार, १३० वरून १०० वर भारताने उडी घेतली आहे. भारताचा समावेश आर्थिक सुधारणेत गती घेणाऱ्या इतर १० देशांच्या यादीतही आहे. शेजारच्या भूतान देशाला या यादीत ७५ वा क्रमांक मिळाला आहे. तर नेपाळ १०५ व्या क्रमांकावर आहे. आठ महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांमुळे, योग्य आर्थिक धोरणांच्या अंमलबजावणीमुळे आणि कर व्यवस्था सुलभ केल्यामुळे भारताची स्थिती सुधारली आहे, असे जागतिक बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment