वोडाफोन देत आहे १८१ रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग!


नवी दिल्ली : स्वस्त डेटा आणि कॉलिंगचा प्लॅन रिलायन्स जिओने सादर केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्राईझवॉर सुरु झाले आहे. एअरटेल आणि आयडिया कंपनीने गेल्या काही दिवसात ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅनची घोषणा केल्यानंतर आता मोबाईल निर्माता कंपनीसोबत मिळून एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांनी स्वस्त ४जी प्लॅन सादर केले. आता युजर्ससाठी वोडाफोनने अजून एक स्वस्त प्लॅन सादर केला आहे. १८१ आणि १९५ रुपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे.

वोडाफोनने सादर केलेल्या प्लॅनमध्ये १८१ रुपयांत अनलिमिटेड डेटा मिळत आहे. पण हा डेटा ४जी नसून २जी असेल. या प्लॅनमध्ये याव्यतिरिक्त अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देखील मिळत आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून त्याचबरोबर युजर्संना १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २जी, ३जी आणि ४जी नेटवर्कसाठी १ जीबी डेटा मिळेल.

१९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर दररोज २५० मिनिट आणि आठवड्यातून १००० मिनिटे कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लॅनची वैधता देखील २८ दिवसांची असून वोडाफोनने दिवाळी सीजनमध्ये ३९९ रुपयांचा प्लॅन सादर केला होता. ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस या प्लॅन देखील उतरला.

Leave a Comment