बीएसएनएलने लॉन्च ४ जी फीचर्ससह स्वस्त स्मार्टफोन


मुंबई : ‘भारत-१’ या नावाने ४ जी फीचर्स फोन भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड आणि मायक्रोमॅक्स यांनी लॉन्च केला आहे. २२०० रुपये ऐवढी या फोनची किंमत असून हा फोन खरेदी करणाऱ्याला अमर्यादीत इंटरनेट डाटा आणि कॉलिंग सुविधा देण्यात येणार आहे. टेलिकॉम क्षेत्रात आता बीएसएनएलच्या या नव्या ऑफरमुळे मोठी स्पर्धा वाढणार आहे.

रिलायन्स जिओला बीएसएनएल आणि मायक्रोमॅक्सचा हा फोन टक्कर देणार आहे. फक्त २२०० रुपयांत हा ४ जी फोनमध्ये मिळणार आहे. ग्राहकांना या फोनसोबत अमर्यादित डेटा आणि व्हॉइस कॉलिंग मिळेल. बीएसएनएलने त्यासाठी ब्ल्यूप्रिंट ऑफर लॉन्च केली आहे. केवळ ९७ रुपये या योजनेसाठी महिन्यामध्ये खर्च केले जातील. तसेच २८ दिवसांची वैधता असेल. मायक्रोमॅक्सचा दावा आहे की, हा फोन लाइव्ह फोनपेक्षा स्वस्त आहे. ग्राहक यात थेट टीव्ही, व्हिडिओ पाहू शकतील आणि संगीत ऐकू शकतील.

जर आपण ‘भारत-१’सह बीएसएनएलच्या सिम कार्डाचा उपयोग केला तर आपल्याला अमर्यादित डेटा मिळेल आणि ९७ रुपयांच्या योजनेत २८ दिवसांसाठी वैधता असेल. वापरकर्त्याला नवीन प्लॅनमध्ये ५ जीबी उच्च जलद डेटा मिळेल. ५ जीबी डेटा मर्यादा संपल्यावर इंटरनेट चालूच राहणार आहे. परंतु वेग ८० केबीपीएस असेल. तसेच स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग अमर्यादित असेल.

Leave a Comment