आता कार्स देतील पिण्याचे पाणी व वीजही


आजच्या तंत्रयुगात कार ही अत्यावश्यक गरज बनलेली वस्तू लेटेस्ट टेक्नॉलॉजींनी परिपूर्ण केली जात आहे. जीपीएस, स्मार्ट ग्राऊंड सिस्टीम, कॅमेरे, ऑटो ड्राईव्ह, सेंसर्स अशा अनेक अत्याधुनिक फिचर्ससह नवनवीन कार्स बाजारात आणल्या जात आहेत. या फिचर्समध्ये आता आणखी चार फिचर्सही भर पडते आहे. त्यानुसार कार चालविताना तहान लागल्यास कारमध्येच बनलेले पाणी पिता येणार आहे, घरापासून दूर असताना कारमध्ये बसून घरातील वस्तूंवर नियंत्रण ठेवता येणार आहे, कारमध्ये वायफाय वापरता येणार आहे तसेच कार स्वतःच वीज निर्माण करणार आहे.

जनरल मोटर्सने या संदर्भात कांही प्रयोग केले आहेत. त्यानुसार कार चालविताना फोर जी च्या स्पीडने इंटरनेटचा वापर करता येणार आहे.तसेच याच कंपनीने वीज उत्पादन करू शकणारा लष्करी ट्रक तयार केला आहे. त्यात तीन टनी फ्यूल सेल टँक बसविला गेला आहे. वीजेवर चालणार्‍या कार्सही आता वीज उत्पादनही करू शकणार आहेत कॅलिफोनिर्यातील कंपनीने फ्यूल सेल कारची विक्री नुकतीच सुरू केली आहे. यात केमिकल प्रक्रियेमुळे उर्जा उत्पादन केले जाते. त्यामुळे हायड्रोजनचे पाण्यात रूपांतर होते व त्याचा वापर बॅक पॉवर सोर्स म्हणून करता येतो. टोयोटाच्या मिराई मॉडेल मध्ये तयार झालेली वीज ब्लॅक आऊट स्थितीत वीज देऊ शकते.

फोर्डने कारच्या एसी कॉईलपासून बनलेले पाण्याचे थेंब एकत्र करून ते फिल्टर करून कारला बसविलेल्या टाकीत जमा करण्याची सोय केली असून हे पाणी तहान लागेल तेव्हा पिता येणार आहे. इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाने इंटरनेटशी कनेक्ट असलेली घरातील उपकरणे कारमधील रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित करण्याची सुविधा देऊ केली आहे.

Leave a Comment