आता व्हॉट्सअॅपवरही एकाच वेळी अनेकांशी बोलता येणार


व्हॉट्सअॅपमुळे फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणे, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणे अशा अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप दिवसेंदिवस वेगवेगळ्या फीचरचा समावेश करत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये तीन नवीन फीचरचा समावेश गेल्या आठडाभरात करण्यात आला. पण आता व्हॉट्सअॅप अजून सुलभ व्हावे आणि व्यावसायिकांना उपयोगी पडावे असे महत्त्वाचे फीचर आणण्याच्या तयारीत व्हॉट्सअॅप असून लवकरच त्यामुळे युजर्सना व्हॉट्सअॅपवर ऑडिओ कॉन्फरन्स कॉल करता येणार आहे.

भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असली तरी व्हॉट्सअॅपमध्ये प्रतिस्पर्धी अॅपमध्ये असणारी अनेक युनिक फीचर मात्र नाहीत. त्यामुळेच गेल्यावर्षभरापासून अधिकाअधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंग, जीआयएफ, स्टेटस अपडेट, लाईव्ह लोकेशन, नोटिफिकेशन अशा अनेक फीचरचा समावेश केला. व्हॉट्सअॅप यावेळी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल हे नवे फीचर आणण्याच्या तयारीत असल्यामुळे अनेक लोकांशी एकाचवेळी बोलता येणे शक्य होणार आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलला इंटरनेटच्या जास्तीत जास्त वापरामुळे युजर्सची तुफान प्रसिद्धी लाभली असल्यामुळे व्हॉट्सअॅपला आपले नवे कॉन्फरन्स कॉलिंगचे फीचरही प्रसिद्ध होईल, अशी आशा आहे.

Leave a Comment