मेक इन इंडिया व्होल्व्हो एक्ससी ९० लाँच


स्वीडीश लग्झरी कार मेकर कंपनी व्होल्व्हो ने भारतात कार असेंब्ली सुरू केली असून त्यांची पहिली असेंबल्ड एसयूव्ही एक्ससी ९० भारतात लाँच केली आहे. ही कार कंपनीच्या बंगलोर उत्पादन केंद्रात असेंबल करण्यात आली आहे. कंपनीने २०१७ पासून भारतात कार असेंब्ली सुरू केली जात असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत कंपनीच्या व्होल्व्हो ट्रक्स प्लाँटमध्ये असेंबलींगचे काम सुरू झाले आहे.

भारतात या कारचे डिझेल व्हेरिएंट असेंबल केले जाणार आहे. प्लग इन हायब्रिड मॉडेल आयात केले जाणार आहे. या शिवाय व्होल्व्हो सेदान एस ९० व नव्याने लाँच होणारी एक्ससी ६० येथेच असेंबल होणार आहेत.

या कारची एक्सशो रूम किंमत ७२.८१ लाख रूपये असून ही ऑटो ट्रान्समिशन एसयूव्ही आहे. ही कार लिटरला १७.२ मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. भारतातच कार असेंबल केल्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार असून कार कमी किमतीत मिळू शकणार आहे. सध्या व्होल्व्होचा भारतीय ऑटो बाजारातील हिस्सा ५ टक्के आहे तो २०२० पर्यंत १० टक्क्यांवर नेण्याचे उदिष्ट कंपनीने ठेवले आहे.

Leave a Comment