
मुंबई – पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही कमी केल्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये तर डिझेल प्रति लिटर १ रुपयांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
राज्यात मध्यरात्रीपासून स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने संतापाचा आगडोंब उसळला होता. हा आगडोंब शमविण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. पेट्रोल- डिझेलवरील कर राज्य सरकारनेही कमी करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते.
राज्य सरकारनेही मंगळवारी पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. व्हॅट कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. पेट्रोल लिटरमागे २ तर डिझेल लिटरमागे १ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
