शहीदांसाठी आयसीआयसीआय बँकेकडून १० कोटी


भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक आयसीआयसीआय १० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांनी जाहीर केले. ही मदत दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. त्यातील पाच कोटींचा पहिला चेक संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. कार्पोरेट सामाजिक दायित्व म्हणून ही मदत दिली जात असल्याचे कोचर यांनी सांगितले.

कोचर यावेळी बोलताना म्हणाल्या पैसा देऊन शहीद जवानाच्या हौतात्म्याची भरपाई करता येत नाही याची जाणीव आहे. मात्र शहीद कुटुंबियांच्या कल्याणासाठी कांही यातून करता येणार आहे. पहिल्या टप्यातील मदतीतून शहीदांच्या विधवांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मदत तसेच त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत केली जाणार आहे. शहीदांच्या मुलांना चांगले शिक्षण व रोजगार मिळण्यासाठी तसेच त्यांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी हे पैसे वापरले जाणार आहेत.

Leave a Comment