जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीने लॉन्च केला धमाकेदार प्लान


नवी दिल्ली : अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी नवा टेरिफ प्लान लॉन्च केला आहे. ३४९ रूपये ऐवढी या नव्या प्लानची किंमत असून याची २८ दिवसांची मर्यादा आहे.

ग्राहकांना या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानला आरकॉमने फ्रिडम पॅक असे नाव दिले आहे. ग्राहकांना ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि २८ जीबी डेटा मिळेल. कंपनीने यासोबतच आणखी एक टेरिफ प्लान लॉन्च केला असून याची किंमत १९३ रूपये ऐवढी आहे. यूजर्सना या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी १ जीबी ३जी डेटा मिळेल. यासोबत कोणत्याही नेटवर्कवर ३० मिनिटांची कॉलिंग ऑफर दिली जाणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांसाठी असेल.

Leave a Comment