अरब महिलांना संधी


सौदी अरबस्तानात एक क्रांती झाली आहे. तिथल्या महिलांवर असलेली कार चालवण्यावरची बंदी उठवण्यात आली आहे. त्या देशातल्या महिलांनी या निर्णयाच्या विरोधात बंड केले होते. त्याची सार्‍या जगात चर्चाही झाली आणि तिथल्या सरकारच्या विरोधात जगात नाराजीही व्यक्त करण्यात आली. पण त्या समोर झुकून तिथल्या राजांनी हा निर्णय घेतला आहे पण तसे मान्य न करता राजांनी हा निर्णय घेण्यास ही वेळ योग्य असल्यामुळे तो घेतला असल्याचे समर्थन केले आहे. राजांनी या निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली होती. या लोकांनी ही सूचना केली. कारण कोणतेही असो पण सौदी अरबस्तान हा महिलावरील हा निर्बंध उठवणारा जगातला सर्वात शेवटचा देश ठरला आहे.

अर्थात असे असले तरीही तिथे लागू असलेले महिलांवरचे अन्य निर्बंध अजूनही उठवण्यात आलेले नाहीत. तत्यांना अजूनही पूर्ण अंग झाकणारा बुरखा घालण्याचा नियम लागू आहेच. त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही. मात्र घरातल्या कोणत्याही पुरुषाची परवानगी असेल तर त्यांना बाहेर पडता येते. हे नियम मोडले तर कडक सजा दिली जाते.अशा नियमांच्या बाबतीत काही महिलांनी बंड केले होते. २०११ साली एका बाईने नियमांचा भंग करीत गाडी चालवून अटक करून घेतली होती. तिने आता सरकारच्या या निर्णया विषयी आनंद प्रकट केला आहे. सौदी अरबस्तान हा अमेरिकेचा मित्र देश आहे. अमेरिकेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. जगभरातही तसेच कौतुक होत आहे पण सौदीमध्ये काही नाराजीचे सूर उमटले आहेत.

काही धर्मगुरूंनी या विषयी नापसंती प्रकट केली आहे. कारण त्यांना अजूनही इस्लामच्या नियमांना महिलांचे हे स्वातंत्र्य धरून नाही असे वाटते. त्यांनी आपल्या राजांच्या या नियमावर एक प्रश्‍न उपस्थित केला आहे. काही वर्षांमागे बायकांनी गाडी चालवणे हे धर्मबाह्य होते मग आताच ते धर्ममान्य कशाने झाले असा त्यांचा सवाल आहे. तत्यात तथ्य आहे कारण इस्लामचे कायदे बदलत्या काळानुसार कधीच बदलत नसतात. अर्थात सौदी अरेबियाच्या आधीच अनेक इस्लामी देशांत महिलांवरचे अनेक निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. मग नेमका इस्लामचे कायदे कोणाला समजले आणि कोणाला नाही असा प्रश्‍न निर्माण होईल. शेवटी कायदा अन नियम हे कशासाठी असतात हेच नीट समजले तरच ठीक आहे.

Leave a Comment