या देशांकडे आहेत आकर्षक रंगीबेरंगी विमाने


प्रत्येक प्रवासी कधी ना कधी विमान प्रवास करत असतोच. आजकाल तर विमान प्रवास रेल्वेपेक्षाही स्वस्त झाल्याने विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मात्र एकदा विमान प्रवास केला की त्याचे कुतुहल संपते. ज्यांना वारंवार विमान प्रवास करावा लागतो, त्यांना तर या एकसुरी प्रवासाचा पुढेपुढे कंटाळाच येऊ लागतो.बालपणी आकाशातून उडणार्यात पांढर्‍या विमानांबद्दल खूपच आकर्षण असते मात्र नंतर तोच तोच पांढरा फटक रंग नावडेनासा होतो. यामुळे काही देशांनी त्यांची विमाने कलरफुल व अगदी आकर्षक रंगात रंगवून घेतली आहेत व ती पाहिली की या विमानातून आपण कधी जाणार अशी उत्सुकता नककीच वाटू शकते.


एअरफ्रान्सचे रॉक इन रिओ हे जगातले सर्वात सुंदर पेटींग असलेले विमान म्हटले जाते याचे कारण ज्या जॉन ब्रांब्लिट याने हे विमान रंगविले आहे तो अंध आहे आणि विना ब्रश केवळ हातांच्या बोटांनी त्याने हे विमान अप्रतिम कलाकारीने सजविले आहे.


एअर न्यूझीलंडचे ड्रॅगन स्मॉग विमान हॉलीवूड मुव्ही हॉबिटच्या तिसरा भाग रिलीज होण्याच्या दरम्यान रंगविले गेले आहे. या चित्रपच्या थीमवर अशी अनेक विमाने रंगविली गेली असून ती प्रवाशांना जादुई दुनियेत नेतील असा भास करून देण्यात यशस्वी ठरली आहेत.


कॅनडातील वेस्ट जेट विमान कंपनीने २०१३ साली अॅनिमेटेड मूव्ही फ्रोजन च्या थीमवर विमान पेंटींग्ज केली असून यातील सर्व कॅरेक्टर म्हणजेच प्राणी हलते बोलते वाटतात. बोईंग ७३७ मॉडेलचे हे विमान रंगविण्यासाठी १७० गॅलन रंग लागला आहे.


दुबई या श्रींमत देशांच्या यादीत असलेल्या देशाच्या विमान कंपनीने ३३ बोईंग जेट विमाने कलरफुल पेंटींग्जनी सजविली आहेत.ही विमाने पाहिली की आपण कधी त्यातून प्रवास करू अशी इच्छा झालीच पाहिजे. त्यातील एक विमान रियल माद्रिदच्या फुटबॉल पटूंच्या चित्रांनी सजले आहे तर अन्य युनायटेड फॉर वाइल्ड लाईफ या थीमवरही अनेक विमाने रंगविली गेली आहेत.


जोहान्सबर्गच्या कुआला कंपनीने अनेक विमाने कमी खर्चात पण अतिशय कलात्मकतेने रंगविली आहेत.विमानाच्या आत कुठली उपकरणे कुठे आहेत हे विमानात न जाताही बाहेरच्या पेंटींग्ज वरून लक्षात येते.


इव्हा एअरलाईन्सने शिकागो वरून आशियाई देशात जाणार्‍या बोईंग ७७७ विमानावर फेमस जपानी कार्टून हॅलो किटी चित्रांकित केली आहे. इतकेच नव्हे तर या विमानातील हवाई सुंदरीही तशाच पोशाखात असतात.


आईसलँडमधील आईसलँडर या विमानकंपनीची बहुतेक विमाने ज्वालामुखीच्या नावावर आहेत. मात्र त्यांच्या एका विमानाला प्रसिद्ध ग्लेशियर म्हणजे हिमनदीचे नांव दिले गेले असून त्या विमानाला तसाच लूक दिला गेला आहे.

Leave a Comment