फॉर्च्युनच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय


न्यूयॉर्क – अमेरिकेबाहेर व्यवसाय जगतातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या क्रमवारीत चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर अमेरिकेच्या यादीत पहिल्या तीनमध्ये इंद्रा नूई यांनी स्थान मिळवले आहे.

बॅनको सॅनटॅनडर ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्ष अॅना बॉटिन यांनी अमेरिकेबाहेर असलेल्या व्यवसाय क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तर आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांनी ५ वे स्थान आणि अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांनी २१ वे स्थान पटकावले आहे. पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि सीईओ इंद्रा नूई यांनी अमेरिकेतील व्यवसाय क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून आठ वर्षांपासून त्यांनी भारतातील सर्वांत मोठ्या खासगी बँकेचे नेतृत्व करत असल्याचे फॉर्च्युन मासिकाने म्हटले आहे. फॉर्च्युन मासिकाने अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांच्याबद्दल म्हटले आहे की, मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शर्मा यांची पुन्हा निवड झाली आहे. यापुढे त्या बँकेच्या डिजिटल सेवांवर लक्ष केंद्रीत करू शकतात. यामध्ये डिजिटल पेमेंट अॅप्सचा जास्तीत जास्त वापर वाढवण्यावर भर असेल.

चार निकषांचा विचार या यादीत नावांचा समावेश करताना केला आहे. त्यात पहिल्या निकषात जागतिक अर्थव्यवस्थेत त्या स्त्रीच्या व्यवसायाचा आकार आणि व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेण्यात आले आहे. दुसरा निकष व्यवसायाची स्थिती आणि भविष्यातील वाटचालीच्या दिशा, तिसरा निकष त्या स्त्रीच्या करिअरचा प्रवास आणि चौथा निकष त्या स्त्रीचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव किती हा आहे.

Leave a Comment