नागा बंडखोरांना धडा


मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवर केलेल्या दहशतवाद विरोधी सर्जिकल स्ट्राईकचे रामायण अजून संपलेले नाही. त्या पश्‍चिमेच्या स्ट्राईकमुळे पाकिस्तानातले दहशतवादी तर हादरलेच पण त्यापेक्षा भारतातले मोदी विरोधक जास्त धास्तावले. कारण काही दिवसांपूर्वी मोदी हे दुबळे पंतप्रधान आहेत असा प्रचार करण्याचा त्यांच्या विरोधकांचा प्रयास जारी होता पण त्यांनी तर आपला कणखरपणा केवळ पाकिस्तानलाच नाही तर सार्‍या जगाला दाखवून दिला. त्यामुळे या दुष्ट प्रचारातली हवाच निघून गेली. या कणखरपणाच्या दर्शनानंतरही या विघ्नसंतोषी लोकांनी दुबळेपणाचा प्रचार जारीच ठेवला असता तर उलट प्रचार करणारांचेच हसे झाले असते. म्हणून या लोकांनी अशी काही कारवाई झालीच नाही असा खोटा प्रचार सुरू केला मात्र मोदी यांच्या या वज्र निर्धारापासून त्यांची पाकिस्तानमधील माध्यमे आणि काही नेते स्तुती करायला लागले त्यामुळे तर राहुल गांधी आणि केजरीवाल अशा विदुषकांची चेहरे बघण्यालायक झाले.

अजून त्यांचे चेहरे जागेवर येत नाहीत तोच मोदी सरकारने अशीच एक सर्जिकल स्ट्राईकवजा कारवाई पूर्व सीमेवर केली आहे. आणि नागा बंडखोरांना धडा शिकवला आहे. भारत-म्यानमार सीमेवर हा सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने १५ बंडखोरांना यमसदनाला पाठवले आहे. नॅशनल सोशॅलिष्ट कौन्सील ऑफ नागालँड (एनएससीएन) या संघटनेवर ही कारवाई झाली. या कारवाईत नागा बंडखोरांचे प्रशिक्षण शिबीरही उद्ध्वस्त करण्यात आले. या नागा बंडखोरांनी कालच या भागातल्या सीमेवर पहारा ठेवणार्‍या भारतीय लष्करावर हल्ला केला होता. भारतीय लष्कराच्या पूवर्र् विभागाने या हल्ल्यानंतर काही तासातच बंडखोरांच्या ध्यानीमनी नसताना अचानकपणे हा सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यांची त्रेधा उडवली. नागा बंडखोर लष्करावर हल्ला करून पळून म्यानमार मध्ये पळून जाण्याच्या विचारात होते पण दरम्यान त्यांना भारतीय जवानांनी गाठले आणि त्यांच्या १५ बंडखोरांना कंठस्नान घातले. यात लष्कराच्या बाजूने कसलेही नुकसान झाले नाही. भारताच्या लष्कराला सीमाही पार करावी लागली नाही. २१०५ साली जूनमध्ये याच संघटनेच्या बंडखोरांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. पण त्याही वेळा भारताने जोरदार प्रतिहल्ला करून त्यांच्या काही बंडखोेरांना संपवलेच पण काही शस्त्रेही हस्तगत केली.

त्यावेळी भारतीय लष्कराला भारत आणि म्यानमार यांच्यातली सीमा ओलांडावी लागली होती. भारताचा तेव्हाचा तो प्रतिहल्ला मोठा होता आणि दहशतवादी संघटनेची दोन शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती आताची कारवाई त्यामानाने सौम्य होती पण भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान सुमारे १ हजार ८०० किलो मीटर्सची मोठी सीमा असून तिचे रक्षण करणे मोठे कठीण आहे कारण ही सीमा बंद नाही. ती जंगलांतून आणि काही ठिकाणी टेकड्यांतून जाते. तिचे रक्षण करण्यात अनेक अडचणी येतात. पण त्यातूनही लष्कराने ही कारवाई केली आणि नागा बंडखोरांना कायमचा धडा शिकवला. या कारवाई बद्दल सरकारचे आणि जवानांचे अभिनंदन केले पाहिजे. अशा प्रकारच्या घटना याच सीमेवर अरुणाचल प्रदेशातही होत आहेत अणि तिथले जवान त्यांचाही जागेवरच बंदोबस्त करीत आहेत. आता अशी कारवाई केल्याने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा चांगली होणे अपरिहार्य आहे कारण आजवर दहशतवादी कारवायांबाबत कोणत्याच सरकारने एवढे कठोर धोरण अवलंबिलेले नव्हते. आता मोदी सरकारच्या धोरणाचा अनुभव नित्य येत आहेे.

हा अनुभव अनेक पातळयांवर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिनिधींना पळता भुई थोडी झाली. पाकिस्तान सातत्याने या जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करून आपले शेपूट कधीच सरळ होणार नाही हे दाखवत असतो. पण आता त्याला ही हाकाटी जरा जोरदारपणे करावीशी वाटली आणि पाक प्रतिनिधीने काश्मीर मध्ये महिलांवर भारतीय लष्कराकडून अत्याचार होत असतात याची कहाणी सचित्र सादर करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी त्यांनी दाखवलेले चित्र काश्मिरी तरुणीचे नसून ते पॅलेस्तिनी तरुणीचे आहे हे उघड झाले आणि पाकिस्तानला याही पातळीवर उघडे पडावे लागले. पाकिस्तानचा बनावटपणा त्याला सार्‍या जगासमोर उघड झाल्याने त्याची फजिती झालीच पण या मुद्यावर पाक एकाकी आहे हे दाखवणार्‍या काही घटना घडल्या. चीनने पाकिस्तानला काश्मीर प्रश्‍न भारताशी चर्चा करूनच सोडवावा लागेल असे बजावले. ही पाकिस्तानसाठी मोठी चपराक आहे. भारताने डोकलाममध्ये बंदुकीची एकही गोळी न झाडता चीनला शरण आणले आणि मोठ्या मुत्सद्दीपणाने हा प्रश्‍न सोडवला. यात चीनची नामुष्की झाली असतानाही चीनने याच काळात काश्मीरच्या प्रश्‍नावर चीनची साथ सोडून भारताला अनुकूल भूमिका घेतली ही गोष्ट भारतासाठी कोतुकास्पद आहे.

Leave a Comment