एकाच दिवसात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड


मुंबई : काल राज ठाकरेंनी लाँच केलेल्या फेसबुक पेजने एकाच दिवसात सर्व रेकॉर्ड मोडले असून एकाच दिवसात या पेजला तब्बल पाच लाखाहून अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले आहेत.

काल राज ठाकरे यांनी आपले पेज लाँच केले होते. एकाच दिवसात पेजच्या उद्घाटनाच्या भाषणाला २ लाख ६० हजार हिट्स मिळाले आहेत. राज ठाकरे या पेजवरून महिन्यात एकदा तरी फेसबुक लाईव्ह करणार आहेत. त्यांनी फेसबुकवर एन्ट्री लोकांशी संवाद साधण्यासाठी केली आहे. एकाच दिवसात त्यांचे पेज व्हेरिफाईडही झाले.एका दिवसात ऐवढी प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यामुळे आता या पेजवरून राज ठाकरे सामान्यांशी किती प्रभावी संवाद साधतात हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर मनसेला या पेजचा किती फायदा होतो हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment