माहिती तंत्रज्ञान, बीपीओंतील ७ लाख कर्मचारी होणार बेरोजगार !


नवी दिल्ली – येत्या काही वर्षांमध्ये ऑटोमेशन (स्वयंचलन) आणि आर्टिफिशियल इंटलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) मोठा फटका माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कमी कुशल कर्मचाऱ्यांना बसणार असून या क्षेत्रातील तब्बल ७ लाख नोकरदारांना याची झळ बसू शकेल. २०२२ पर्यंत या क्षेत्रातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. ही माहिती एचएफएस रिसर्च या अमेरिकेन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

ऑटोमेशनमुळे याआधीही अनेक क्षेत्रांमधील लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ऑटोमेशनमुळे अभियांत्रिकी, उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग यासाख्या क्षेत्रांमधील नोकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा सेवा आणि कृषी क्षेत्रावर ऑटोमेशनचा वेग वाढल्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ उद्योगातील कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे २०२२ मध्ये १७ लाखांवर येईल.

कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना २०२२ पर्यंत कंपन्यांकडून नारळ देण्यात येईल. पण मध्यम आणि उच्च कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत याच कालावधीत वाढ होईल. २०१६ मध्ये मध्यम कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची ९ लाख असलेली संख्या २०२२ पर्यंत वाढून १० लाखांपर्यंत पोहोचेल.

Leave a Comment