'रॉयल एनफिल्ड'च्या क्लासिक सीरिजच्या दोन बाईक बाजारात दाखल - Majha Paper

‘रॉयल एनफिल्ड’च्या क्लासिक सीरिजच्या दोन बाईक बाजारात दाखल


नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी लक्षात घेता टू व्हिलर कंपनी ‘रॉयल एनफिल्ड’ने ग्राहकांसाठी आपल्या क्लासिक सीरिजच्या बाईक आणखी दोन नव्या रंगात बाजारात उतरवली आहे. याशिवाय पहिल्यांदाच क्लासिक सीरिजमध्ये फ्रंटसोबतच रिअर व्हीलमध्येही डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

३५० सीसी इंजिन क्लासिक गनमेटल ग्रे रंगात उपलब्ध करून दिली असून १.५९ लाख रुपये या बाईकची किंमत निर्धारित करण्यात आली आहे. तर ५०० सीसी इंजिनची क्लासिक स्टेल्थ ब्लॅक रंगात सादर करण्यात आली आहे. याची किंमत २.०२ लाख रुपये आहे. रॉयल एनफिल्ड नेहमीच आपले लोकप्रिय मॉडेल्स नव्या ढंगात आणि नव्या रंगात सादर करत आली आहे. कंपनीच्या क्लासिक सीरिजला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.

Leave a Comment