पत्रकारांच्या हत्या


कर्नाटकात बंगलुरू येथे बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांची काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रकार त्यांच्या घराजवळच घडला. ५५ वर्षे वयाच्या गौरी या आपल्या घराजवळ आपली कार पार्क करीत असताना हा प्रकार घडला. त्या लंकेश पत्रिके या नियतकालिकाच्या संपादक होत्या आणि त्यांचा भाजपाच्या काही नेत्याशी दावा होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही भाजपा नेत्यांच्या विरोधात लेखन केले होते पण ते बदनामीकारक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे शिक्षाही भोगली होती. हा दावा माहीत असणारे लोक त्यांची हत्या भाजपाच्या कार्यकर्त्यांपैकीच कोणी तरी केली असावी असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

असा आरोप करणारांत राहुल गांधंी हेही आहेत. त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोप अशा फैरी तिथे झडायला लागल्या आहेत. पण या संबंधात अजून कसलाही पुरावा सापडलेला नसल्याने असा कोणावर तरी आरोप करणे हे गैर आहे असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत पत्रकारांच्या हत्यांचे सत्र जारी आहे. उत्तर प्रदेशाच्या शहाजहानपूर येथील एक स्वतंत्र पत्रकार जगेन्द्रसिंग यांनाही तिथल्या समाजवादी सरकारमधील मंत्री राममूर्ती वर्मा यांनी मारले आहे. जगेन्द्रसिंग यांनी एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात रस घेऊन शोधकाम सुरू केले होते पण वर्मा यांचा संबंध या प्रकरणाशी होता म्हणून त्यांनी जगेन्द्रसिंग याला त्याच्या घरी जाळून मारले. त्याने मृत्यूपूर्व जबाबात या मंत्र्याचे नाव घेतले म्हणून हा मंत्री आता अटकेत आहे.

महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात संदीप कोठारी या पत्रकाराची हत्या झाली. तो वाळू तस्कराच्या विरोधात लेखन करीत होता. त्याला काही मारेकर्‍यांनी जंगलात नेऊन मारले. उत्तर प्रदेशातच अशाच रितीने राजदेव रंजन या पत्रकाराची हत्या २०१६ साली करण्यात आली. राजदेव रंजन हा हिंदुस्तान टाइम्समध्ये कामाला होता. या हत्येचे कारण काही पोलिसांनी सांगितलेले नाही पण त्याने काही राजकीय नेत्यांची वंशावळ आपल्या दैनिकाकडे पाठवलेली होती. त्यामुळे त्याची हत्या झाली असावी असा तर्क आहे. उत्तर प्रदेशातच हेमंत यादव या पत्रकाराची हत्या झाली. हा प्रकार २०१५ साली झाला. यादव यांनीही अनेक भ्रष्टाचायार्र्ंच्या कहाण्या उजेडात आणल्या होत्या पण त्यामुळे आपण उघडे पडू अशी भीती काही नेत्यांना वाटत होती. त्यांनीच हेमंत यादवचा काटा काढला आहे. लहान असोत की मोठे असोत पण काही भ्रष्टाचारी लोक आता सापडायला लागले आहेत.

Leave a Comment