२५ सप्टेंबरपासून मिळणार जिओ फोन !


मुंबई – रिलायन्स जिओच्या मोफत फोनची ग्राहकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जिओ फोनची अगोदर प्री बुकिंग थांबवण्यात आली होती आणि ज्यांनी फोनसाठी नाव नोंदविले आहे त्यांना जिओ फोनसाठी वाट पाहावी लागणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिओ फोनची डिलिव्हरी देण्यात येणार असल्याचे पहिल्यांदा सांगण्यात आले होते. पण कंपनीने ही तारीख आता पुढे ढकलली आहे. आता २५ सप्टेंबरपासून जिओ फोनची शिपिंग सुरू होणार आहे.

शिपिंग तारीख या फोनला जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे वाढवण्यात आली. दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये जिओ फोन २४ सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरू केली जाईल. हा फोन जेव्हा तुमच्या जवळच्या जिओ स्टोअरमध्ये येईल, तेव्हा ग्राहकाला कंपनीकडून मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. तुमच्या परिसरातील जिओ स्टोअरमधून तुम्ही बुक केलेला जिओ फोन मिळणार आहे. दरम्यान, बुकिंग कधीपासून सुरू होईल याची माहिती देण्यात येईल, असे कंपनीच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

Leave a Comment