महिला पूरोहित – बदलत्या काळाचे चिन्ह

purohit

महिला पुरोहितांच्या दृष्टीने पुणे ही भारताची राजधानी झाली आहे.गेल्या पंचवीस वर्षांत पुण्यात जवळ जवळ दहा हजार महिला पुरोहित तयार झाल्या.आज त्यातील सुमारे आठ  हजार महिला राज्यात विविध धार्मिक विधींचे पौरोहित्य करीत आहेत.यामुळे शतकानुशतके चालत आलेली पुरुषांच्या पौरोहित्यांचा एकाधिकार संपुष्टात आला तसेच ब्राम्हण वर्गाचाही एकाधिकार संपुष्टात आला.कारण येथील ज्ञान प्रबोधिनी आणि गेल्या पिढीतील जाणकार संस्कारपुरस्कर्ते श्री.शंकरराव थत्ते यांचे काम मोठे आहे.शंकरराव थत्ते यांच्या निधनानंतर त्यांचे काम शंकर सेवा समिती या नावाने सुरु आहे.आपल्या हिदू धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. लक्षावधी देवदेवतांचे अधिष्ठान असलेल्या या धर्मात मानवावर सोळा संस्कार व्हावेत असा संकेत आहे. बदलत्या काळाबरोबर या क्रियाकर्मात ही अनेक स्थितंतरे आली. आधुनिकता आली तरीही शक्य तेवढी धार्मिक कार्ये करण्याची परंपरा आजही पाळली जाते.अनेक सुधारणा,बदलंाशी जमवून घेतलेल्या आपल्या धर्मात एका बाबतीत मात्र अजूनही फारसा बदल झालेला दिसत नाही. तो म्हणजे सर्व पूजापाठ, धार्मिक कृत्ये पुरुष पुरोहिताकडूनच करून घेतली जातात. व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात पुरुषंाची मत्त*ेदारी मोडून काढलेल्या महिलाना पौरोहित्याचे क्षेत्र आजपर्यंत काबीज करता आलेले नव्हते. मात्र आता या ही क्षेत्रावर स्त्रियांचे अधिराज्य येऊ पाहते आहे.
   पारंपारिक  पूजा साधनांमध्ये निरंजने, तेल दिव्यांची जागा आता विजेचे दिवे घेत आहेत. मंत्रपठणाऐवजी आता कॅसेटवर मंत्र म्हणणे मान्य झाले आहे. अगदी सोळावा संस्कार म्हणजे अंत्यसंस्काराचे विधीही कॅसेटवर ऐकून पार पाडणे भाग पडते आहे.मात्र काही धार्मिक कृत्ये पुरुष पुरोहितांकडनच करुन घ्यायचा आग्रह आजही कायम दिसतो. श्रावण महिना आणि गणपतीच्या दिवसात या पुरोहिताना वेळ मिळत नाही मग पहाटे दोन वाजताही गणपती बसविला जातो.यावरचा उत्तम मार्ग म्हणजे स्त्रियानी  या क्षेत्रात उतरणे हा होता.ही आडवाट राजरस्त्यात रुपांतरीत करण्याचा मान पुण्यातील दोन संस्थानी मिळविला आहे. व आज निदान पुण्यात तरी पुरुष पुरोहितांच्या बरोबरीने महिलाहीं पौरोहित्य करण्यात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे चोखंदळ समजल्या जाणार्‍या पुणेकरांनी महिला पुरोहितांना चांगलीच पसंती दिली आहे.
    शंकर सेवा समिती यंा संस्थेने  १९७६ साली सर्व जातीतील महिलाना पौरोहित्य शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला व आज सर्व राज्यात मिळून सुमारे ७०००  महिला प्रत्यक्ष पौरोहित्यात आहेत.त्यानी हे शिक्षण देऊन  मोठेच काम केले आहे. या संस्थेत धार्मिक कृत्ये शिकण्यासाठी येणार्‍या महिलांची संख्या फार मोठी आहे. या संस्थेतून शिकून तयार झालेल्या या महिला पुरोहित आज सन्मानाने हे काम करत आहेत.
ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने ही महिलांना हे शिक्षण देण्याचा उपक्रम १९९० साली सरु केला .त्यानीही सर्व जातीधर्माच्या महिला पुरुषांसाठी हे वर्ग चालविले असून त्यातून आतापर्यत ८०० जणांनी शिक्षण घेतले असून त्यापैकी महिलांची संख्या अधिक आहे.महिलांनाही पौरोहित्य करता येते ही बाब प्रत्यक्षात आल्यावर अनेक जाणत्या जुन्या वैदिक मंडळींनीही महिलांना शिकवण्यास घेतले आहे.पण ज्ञानप्रबोधिनीचे वैशिष्ठय म्हणजे  आजकाल मुळातच सर्वांनाच वेळेची कमतरता भासते. मग धार्मिक कृत्ये एकतर लांबणीवर टाकली जातात किवा कशीतरी उरकली जातात. असे होऊ  नये व धर्मकृत्याचे पूर्ण समाधान मिळावे यासांठी त्यानी आधुनिकतेशी हातमिळवणी करून प्रत्येक संस्कारातील केले गेलेच पाहिजेत असे आवश्यक विधी पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत.
   या प्रकारची सुमारे २० पुस्तके त्यानी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये मूळ संस्कृत श्लेाक त्याचा मराठी, हिदी व इंग्रजी अनुवाद ही देण्यात आला आहे. हे बदल करताना कर्मठपणा कमी करण्यावर भर देण्यात आला व लोणावळा येथील धर्मनिर्णय मंडळाच्या परवानगीने या सर्व कृत्यात सुटसुटीतपणा आणला गेला तसेच धर्मकृत्ये, क्रियाकर्मामागचे विज्ञानही लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विषयी अधिक माहिती देताना या संस्थेचे प्रमुख श्री. यशवंत लेले म्हणाले की वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पुरोहिताची संख्या वाढली नाही.एकीकडे आधुनिकतेचा स्विकार होत असतानाही लोकांचा कल धर्मकृत्ये पार पाडण्याकडे अधिकच वाढत चालला आहे. या व्यवसायात पैसा असनही तरुण वर्गाचा सहभाग नगण्य आहे.त्यातूनच महिलाना हे शिक्षण देण्याचा विचार पुढे; आला.महिला हे काम उत्तम करु शकतात शिवाय त्याच्या मदतीने संस्कृती रक्षणाचे कार्य चालु ठेवणेहीं सहज शक्य होते हे आम्ही लक्षात घेतले. त्याचप्रमाणे कोणत्याही धार्मिक कृत्य करण्यापासून महिलांना वंचित ंठेवणे हे योग्य नाही.
   काही वेळा पुरोहित उपलब्ध होत नाहीत म्हणून  धर्मकृत्ये रखडतात , त्यामुळे आम्ही सर्व जातीतील लोकांसांठी हे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. आमच्या ंसंस्थेतून शिक्षण घेतलेल्या व्यत्त*ी कोणाचेही कोणत्याही धर्मकृत्याचे निमंत्रण टाळत नाहीत.समाजाकडूनही आता महिला पुरोहिताना मान्यता मिळत आहे. पूर्वी महिला पुरोहिताना पाठविण्याची गोष्ट झाली की नाके मुरडली जायची. आता मात्र महिलांनाच प्राधान्या दिले जाते. कारण महिला  धर्मकृत्ये करताना कोणताही शॉर्टकट घेत नाहीत. सर्व संस्कारांचा अर्थ समजावून सांगतात व घाई करत नाहीत असे काही नागरिकांनी आवर्जून नमूद केले.
    धार्मिक कृत्याचा संबंध फक्त सोळा संस्काराशी येतो असा एक समज आहे.सोळा संस्काराबरोबर वेदांचे पठण आणि याग यालाही तेवढेच महत्व आहे.त्यातही महिला आघाडीवर  आहेत.वैदिक संशोधन मंडळासारख्या संस्थेच्या संचालिका एक महिला आहेत एवढेच नव्हे तर त्यानी वेदपाठशाळा सुरु करण्याचीही तयारी केली आहे.
  ज्ञानप्रबोधिनीच्या सुनीती गाडगीळ  या महिन्यातून किमान १५ दिवस या कृत्यात व्यग्र असतात. मौजीबंधन, लग्न , बारशी, या कार्यक्रमांबरोबरच त्या श्राध्दविधीही आवर्ज्रून करतात. त्याच्या आईच्या श्राद्धाच्यावेळी ब्राह्मण न मिळाल्याने कशी अडचण आली हे लक्षात आल्यापासून त्या श्राद्धांचे काम मुद्दामहून करतात. त्या म्हणाल्या की स्मशानातील विधी करण्याचीही आमची तयारी आहे.
 मुलींवर उपनयन संस्कार करण्याची प्रथाही या महिला पुरोहितानी नव्याने चालू केली असून पुण्यात अश्याप्रकारे अनेक मुलींवर उपनयन संस्कार करण्यात येत आहेत.
————

Leave a Comment