एक हजार रूपयांची नोट चलनात येणार नाही – जेटली


नवी दिल्ली – केंद्र सरकारने नुकतीच दोनशे रूपयांची आणि ५० रूपयांची नोट चलनात आणली असली तरी या नव्या नोटा एटीएममध्ये येण्यास वेळ लागणार आहे. याच दरम्यान विविध माध्यमांमधून १ हजार रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. पण केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एक हजार रूपयांची नोट चलनात आणण्याचा काहीही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

५०० आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटा नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आणल्या गेल्या. त्यापाठोपाठ ५० आणि २०० रूपयांच्या नव्या नोट चलनात आल्या आहेत. त्यानंतर १ हजार रूपयांचीही नोट चलनात आणली जाईल अशी चर्चा सुरू होती. पण केंद्र सरकारने ही एक हजाराची नवी नोट चलनात आणण्याचा काहाही विचार नाही असे स्पष्ट केले आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आरबीआयने २०० रूपयांची नवी नोट चलनात आणली. ही नोट चलनात १०० आणि ५०० रूपयांच्या नोटांची कमतरता भरून काढण्यासाठी आणली गेली आहे. २ हजार रूपयांची नोट चलनातून बाद होईल अशीही चर्चा होती मात्र २ हजारांची नोट चलनातून जाणार नाही आणि १ हजारांची नवी नोट चलनात येणार नाही असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment