गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार २०० रुपयांची नोट


नवी दिल्ली – २०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा २०० रुपयांची नोट चलनात आल्यामुळे भरुन काढण्यात मदत मिळणार आहे. नवी नोट चलनात आणणार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेची डिझाईन रिलीज केली आहे.

अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च महिन्यातच ही नवी नोट आणण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरक्षा चाचण्या आणि प्रिंटिंग प्रेसमधील क्वालिटी तपासल्यानंतरच ही नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment