सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार नवी २०० रुपयांची नोट!


नवी दिल्ली – येत्या काही महिन्यात २०० रुपयांची नवी नोट भारतीय रिझर्व्ह बॅंक चलनात आणणार असून केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना काढल्याने ही नवी २०० रुपयांची नोट लवकर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने चलनात नवी २०० रुपयांची नोट उपलब्ध करून देण्यास वित्त मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारसीप्रमाणे संमती दर्शविली आहे. आरबीआयने गतवर्षात निश्चलनीकरणानंतर नवीन ५०० रुपयांची नोट चलनात आणली होती. त्याचबरोबर नवीन २००० रुपयांची नोटही बाजारात उपलब्ध करण्यात आली होती. परंतु २००० नोटेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना व्यवहारात अडचणी येत होत्या. त्यामुळेच रोकडसुलभतेसाठी सरकारने नवीन २०० रुपयांची व ५० रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला. सुत्राच्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात नवीन २०० रुपयांची नोट उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment