आता शेअर मार्केटमध्येही आधार कार्ड अनिवार्य


मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी शेअर मार्केटमधील गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता गुंतवणूकदारांना आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक असणार आहे. ब्रोकर्सना ३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्डची माहिती गुंतवणूकदारांकडून घ्यावी लागणार आहे. गुंतवणूकदारांचा आधार कार्ड नंबर ३१ डिसेंबरपर्यंत मिळाला नाही तर अशी अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आत्तापर्यंत पॅन कार्डनंबर बंधनकारक होता. पण एकाच गुंतवणूकदाराची अनेक पॅन कार्ड असल्याचे निदर्शनास आले आणि त्याआधारे बनावट डीमॅट अकाऊंट उघडल्याची माहिती समोर आली. या गैरव्यवहारांना त्यामुळे आळा घालण्यासाठी आता आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.

Leave a Comment