अध:श्रद्धांचा बाजार


खरोखरच आपल्या देशातल्या अंध:श्रद्धा कधी संपणार आहेत हे कळत नाही. शिक्षणाचे प्रमाण वाढले पण लोक अंध:श्रद्धांतून काही मुक्त होत नाहीत. महाराष्ट्रात अनेकदा अशा काही अंध:श्रद्धांचे प्रकार आपल्याला दिसतात पण आता उत्तर प्रदेशाच्या पाच राज्यात कोणी तरी महिलांचे केसच कापून न्यायला लागला आहे. हे काम कोण करतो आणि का करतो हेच समजत नाही. जवळपास ५५ महिलांना या प्रकारामुळे आपले केस गमवावे लागले आहेत. समाजातल्या अशा अंध:श्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी पण महाराष्ट्रात होणारे प्रकार वेगळे होते. काही वर्षांपूर्वी काही गावांत कोणीतरी रात्री अचानकपणे लोकांच्या घरांवर दगडफेक करीत होता. ती कोण करतेय हे काही दिसत नव्हते. त्याला शोधून काढावे तर शोधायला लागताच तो पळून जायचा.

शेवटी पोलिसांनीच या शोधकामाचे आव्हान स्वीकारले त्यावर गावातलेच काही लोक ही दगडफेक करीत असल्याचे दिसून आले. उत्तर भारतातही असाच प्रकार असणार हे नक्की कारण, हा जो कोणी केस कापणारा आहे तो केवळ केसच कापून नेतो. संबंधित बाईला तो कसलाही त्रास देत नाही आणि बेशुद्ध करून मगच केस कापतो. काही लोकांनी आग्रा येथे ६५ वर्षांच्या एका बाईला चेटकीण ठरवले आणि तीच हा केस कापण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप तिच्यावर करून तिला ठार केले. हे सारे प्रकार जसे वाढत आहेत तसा आता त्यामागच्या कारणावर प्रकाश पडत आहे. भानामतीमध्ये असे प्रकार घडत असतात. काही कारणाने उपेक्षित असलेले लोक विशेषत: महिला आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या अशिक्षित महिला लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वत:च डोळ्यातून काचा पाडतात आणि कोणीतरी दुसरेच हा प्रकार करीत असल्याचे नाटक करतात. इतरही काही प्रकार यात केले जातात.

हे प्रकारही ठराविक आहेत. वाळत घातलेले कपडे आपोआप पेटणे, अंगावर काळ्या फुल्या उमटणे. जेवताना ताटात घाण पडणे असे हे प्रकार असतात. अशा महिलांची नीट चौकशी केली की त्या आपणच हे प्रकार करत असल्याचे मान्य करतात. आता सुरू असलेल्या एका प्रकारात पंजाबात मोगा येथे एक शीख मुलाला धार्मिक नियमांनुसार केस वाढवायचे नव्हते. पण तो आपल्या घरात तसे सांगू शकत नव्हता. त्याने स्वत:च आपले केस कापले आणि आपोआप कापले गेले असल्याचे नाटक केले. शेवटी तपास केल्यावर त्याने स्वत:च केस कापल्याचे मान्य केले. अन्यही गावांत असाच प्रकार आढळणार आहे.

Leave a Comment