
इंटेकसने मंगळवारी भारतात पहिला फोर जी इंटेक्स व्होल्ट फिचर टर्बो फोन सादर केला आहे. मुकेश अंबानी यांच्या मोफत जिओ फोनच्या घोषणेनंतर इंटेक्सने त्यांची नवरत्न सिरीज बाजारात आणली असून त्याखाली अन्य आठ मॉडेल्सही सादर केली आहेत. विशेष म्हणजे या फोरजी फोनची किंमत ७०० रूपयांपासून १५०० रूपयांच्या दरम्यान आहे.
नवरत्न सिरीजमधला इंटेक्सचा फोरजी फोन लाँच
टर्बो फोर जी साठी २.४ इंची क्यूव्हीजीए डिस्प्ले दिला गेला आहे.ड्युल कोर प्रोसेसर, ५१२ जीबी रॅम, ४ जीबी इंटरनल स्टोरेज ते ३२ जीबी पर्यंत कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, २ एमपीचा फ्रंट व बॅक कॅमेरा व २ हजार एमएएच बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.
