
सॅमसंग २३ ऑगस्टला त्यांचा नवा प्रिमियम स्मार्टफोन गॅलेक्सी नोट ८ बाजारात लाँच करत आहे. गॅलेक्सी नोट ७ चा सक्सेसर असलेला हा फोन बाजारात दाखल होण्यापूर्वीच त्याच्यासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. फोर्ब्सचा हवाला देऊन समोर आलेल्या रेंडरनुसार हा दमदार स्मार्टफोन एस एट व एस एट प्लस पेक्षाही मोठ्या स्क्रीनसह येत आहे.
मोठ्या हँडसेटसह येतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ८
गोस्टेक मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार या फोनला ६.३ इंची डिस्ले दिला जात आहे तसेच स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसरसह तो येईल. गोस्टेकने त्याचे सर्व अँगलमधून फोटो दिले आहेत. यात ड्यूल बॅक कॅमेरा, यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्ट, फिंगरप्रिंट सेन्सरची बॅक मध्ये बदललेली जागा, थ्री एक्स ऑप्टिकल झूम फिचर यांचा समावेश आहे. हा फोन दोन टप्प्यांत बाजारात आणला जाणार आहे. पहिल्यांदा तो अमेरिका, द. कोरिया व युकेच्या मोठ्या बाजारात येईल व नंतर अन्य देशांच्या बाजारात उपलब्ध केला जाईल. भारतात हा फोन साधारण आक्टोबर दरम्यान येईल असेही सांगितले जात आहे.
