घरगुती सिलेंडरवरील अनुदान थांबवणार केंद्र सरकार


केंद्राने घरगुती वापराच्या सिलेंडरवर देण्यात येणारी सबसिडी संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून तेल कंपन्यांना दर महिना सिलेंडरच्या किमती ४ रूपयांनी वाढविण्याची परवानगी दिली असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेतील एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. मार्च २०१८ पासून सिलेंडरवरील सबसिडी संपूर्ण बंद केली जाणार आहे.

यापूर्वी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपन्यांना १४.२ किलो वजनाच्या सिलेंडरवर दोन रूपये वाढविण्याची परवानगी दिली गेली होती ती आता ४ रूपयांवर नेली आहे. दर कुटुंबाला १२ सिलेंडरसाठी ही सबसिडी दिली जात होती व त्यानंतरचे सिलींडर बाजारभावाने घ्यावे लागत होते. १ जुलै २०१६ पासून सिलेंडरचे दर दर महिना २ रूपयांने वाढविले जात होते व १ जून २०१७ पासून ते ४ रूपयांनी वाढविले जात आहेत.

Leave a Comment