पुढील १५ दिवसांत आवाक्यात येणार टोमॅटोचे भाव


नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत सध्या बाजारात किलोला शंभरी गाठलेले टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता असून हे दर टोमॅटोची आवक वाढणाऱ असल्याने कमी होणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टोमॅटोचे सध्या बाजारात दर प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या दरांवर आवक घटल्याने परिणाम झाला आहे. कोलकातामध्ये २९ जूनला टोमॅटोचे दर ९५ रुपये प्रति किलो आहेत तर दिल्लीत ९२ रुपये किलो, मुंबईत ८० रुपये किलो टोमॅटो तर चेन्नईत ५५ रुपये किलोंनी टोमॅटोची विक्री केली जात होती.

Leave a Comment