५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन आयकर परताव्याकरिता मुदतवाढ


नवी दिल्ली- पाच दिवसांची मुदतवाढ ऑनलाईन आयकर परतावा भरण्याकरिता देण्यात आली आहे. करदात्यांना ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन परतावा भरता येणार आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंतची आयकर परतावा भरण्याची शेवटची मुदत होती. मात्र, सकाळपासून आयकर विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याने संकेतस्थळ ठप्प झाले होते. करदात्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment