सिंहगडावर आठ दिवसांसाठी ‘नो एन्ट्री’


पुणे – पुढील आठ दिवस तुम्हाला सिंहगडावर जाणे शक्य होणार नाही. कारण सिंहगडावर जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर काही काळासाठी हा मार्ग पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सिंहगडाच्या अलीकडे सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मार्गावर रविवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडल्यामुळे तेथील वाहतुक बंद करण्यात आली होती.

काही प्रमाणात दरड काढण्यात आल्यानंतर पर्यटक खाली आले. पण सिंहगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील काही भागात दरड कोसळण्याचा धोक असल्यामुळे पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात दरड कोसळण्याचा निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सिंहगडावरील मार्गावर दरड कोसळल्याच्या भागाची पाहणी करण्यात आली असून आता पर्यंत बहुतांश भागातील दरड काढण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेचा अहवाल पाठवण्यात आला असून त्याचबरोबर काही भागातील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने पुढील ३ दिवस या मार्गावरील दरड काढण्यात येणार असून डागडूजी देखील करण्यात येणार आहे.

Leave a Comment