लखनौ मेट्रोचा उपक्रम


उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ ही आता योगी शासनाच काळात कात टाकून नवे रूप धारण करण्याच्या स्थितीत आहे. लवकरच तेथे मेट्रोे रेल्वे सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशात लखनौ आणि कानपूर अशा दोन शहरांत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहेे. भारतात सर्वांना माहीत असलेले मेट्रो मॅन श्रीधरन यांच्यावर या दोन प्रकल्पांची जबाबदारी आहे. आजही श्रीधरन हे वयाच्या ८५ व्या वर्षी काम करीत असतात आणि मेट्रो रेल्वेची उभारणी करण्यात पुढाकार घेत असतात. आता त्यांना वयामुळे निवृत्त होण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी लखनौ मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. या भेटीच्या वेळी लखनौ मेट्रो प्रकल्पाने आपल्या प्रवाशांना मिनरल वॉटर मोफत देण्याची घोषणा केली. स्वच्छता गृहाची सोयही अशीच विनामूल्य पुरवली जाईल असे कंपनीने जाहीर केले.

श्रीधरन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याकडेे निवृत्तीची अनुमती मागितली. आपल्याला आता या कामातून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी केली. पण योगींनी त्यांची मागणी अमान्य तर केलीच पण त्यांच्यावर अधिक कामांची जबाबदारी टाकली जाईल असे जाहीर केले. लखनौ आणि कानपूर या दोन शहरांत तर मेट्रो रेल्वे होणारच पण आपण आता वाराणसी, आग्रा, मीरत, याही शहरात मेट्रो रेल्वेची योजना आखत आहोत असे त्यांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशातली सात आठ सहरे त्यांना मेट्रो धारक करायची आहेत. त्यांनी हा विचार श्रीधरन यांना बोलून दाखवला तेव्हा निवृत्त होऊन चेन्नईला जाण्याचा आपला विचार रद्द करून ते लखनौतच थांबले. योगी एवढ्या जिद्दीने काम करीत असतील तर त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे असे त्यांनी ठरवले आहे.

श्रीधरन यांची मन:स्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. या मेट्रो मॅनला भारतात बहुतेक शहरांत मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा ध्यास लागलाय. त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना भारतातल्या मेट्रोच्या प्रवासाबाबत खंत व्यक्त केली. चीनमध्ये दरसाल किमान ३०० किलो मीटर्स मेट्रो रेल्वे टाकली जाते. भारतात ती किमान २०० मीटर्स इतक्या वेगाने टाकली जाण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात हा वेग वर्षाला जेमतेम ३० किलो मीटर्स इतकाही नाही. तो वाढावा असा त्यांचा ध्यास आहे. पण भारतातली स्थिती त्याला म्हणावी तशी अनुकूल नाही. अर्थात आता मोदी सरकारने मेट्रो रेल्वेचा वेग वाढवण्याचा निर्धार केला आहे. शहरी जीवन सुलभ करण्यासाठी ही रेल्वे आवश्यक आहे.

Leave a Comment