एनडीडीबीच्या गुणवत्तादर्शक नव्या ‘लोगो’चे अनावरण


नवी दिल्ली – राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी)च्या गुणवत्तादर्शक नव्या ‘लोगो’चे केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी अनावरण केले. डेअरी सहकारी समित्यांच्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण दूध आणि दूध उत्पादनांचे हा लोगो मानक असणार आहे. कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले की, एनडीडीबी गुणवत्ता ‘लोगो’ एक समूहाच्या ब्रँडची ओळख म्हणून याचा शुभारंभ करण्यात येत आहे. डेअरी उत्पादनांच्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण दूध तसेच दुग्धजन्य पदार्शांची हा लोगो ओळख असले.

सिंह यांनी म्हटले की, ग्राहकांचा उत्पादनांच्या गुणवत्तेवर एनडीडीबीच्या या लोगोमुळे विश्वास वाढेल. या गुणवत्ता लोगोचे निरीक्षण अकरा सदस्यीय व्यवस्थापन समिती करेल. या समितीमध्ये डीएडीएफचे प्रतिनिधी तसेच विभिन्न क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चार महासंघांचे व्यवस्थापकीय संचालक सामील आहेत. या समितीमध्ये एफएसएसएआयचे प्रतिनिधी तथा डेअरी उद्योगातील दोन विशेषज्ञ सामील आहेत. त्याचबरोबर या गुणवत्ता लोगोसाठी इच्छुक महासंघ/सहकारी डेअरी /शैक्षणिक स्थान/सरकारी डेअरी संस्था अर्ज करू शकतात.

Leave a Comment