पंतप्रधानांचे स्वागत पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकाने करा


गृहमंत्रालयाच्या सर्व राज्यशासनांना सूचना

नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी अथवा कोणत्याही कार्यक्रमात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देण्याऐवजी फूल अथवा पुस्तक देऊन करा; अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्याच्या दौऱ्यावर येतील त्यावेळी अथवा कार्यक्रमात राज्याच्या वतीने त्यांचे स्वागत करताना पुष्पगुच्छ देण्यात येऊ नयेत. त्याऐवजी फूल अथवा पुस्तक देण्यात यावे; अशा सूचना जारी केल्या आहेत. त्यातही खादीच्या रुमालात गुंडाळलेले फूल दिल्यास अधिक चांगले; असेही सर्व राज्यांच्या सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. या सूचनेचे तंतोतंत पालन करण्यात यावे; असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

यापूर्वी खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच कोणालाही शुभकामना म्हणून भेटवस्तू देताना पुस्तकांचा वापर करावा; असे आवाहन केले होते. वाचन ही सर्वाधिक आनंददायक बाब आहे आणि ज्ञानापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही; असेही ते म्हणाले.

Leave a Comment