उच्चशिक्षितातली गुन्हेगारी


आपल्या देशात चांगले सुशिक्षित लोकही गुन्हेगारीत कसे गुंतलेले आहेत याचे एक उदाहरण आज हैदराबादेत दिसून आले. नशिल्या पदार्थांच्या तस्करीच्या आरोपावरून दोघा उच्चशिक्षितांना अटक करण्यात आली. यातला एक जण शास्त्रज्ञ असून तो अमेरिकेच्या प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या नासा या संस्थेतून निवृत्त झालेला आहे. नासा ही संस्था अवकाश संशोधनात काम करणारी जगातली एक मोठी संस्था समजली जाते. याच संबंधात आंध्र पोलिसांनी एक मोहीम चालवली असून तिच्यात गेल्या आठवडाभरात दहा तस्करांना अटक करण्यात आली आहे. या तस्करांच्या फोनची तपासणी केली असता यांच्या रॅकेटमध्ये हे दोन लोक गुंतलेले असावेत असा संशय बळावला. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली.

अनिश दुंडू आणि रितुल अग्रवाल अशी या दोघांची नावे असून पूर्वी अटक करण्यात आलेल्या सगळ्या तस्करांनीही या दोघांच्या रॅकेटमधील सहभागाला दुजोरा दिला आहे. या दोघांचीही वये तीस वर्षाच्या आसपास आहेत. अनिश याच्यापासून एलएसडीच्या १६ कुप्या तर रितुल याच्याकडून १.२ किलो मादक द्रव्य हस्तगत करण्यात आले. अनिश हा डून स्कूलचा विद्यार्थी असून तो नंतर अमेरिकेत जाऊ शिकला आहे. तिथे त्याने अवकाश शास्त्राची पदवी प्राप्त करून नासात एक वर्ष कामही केले आहे. मात्र तो २०१२ साली स्वत:चा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने भारतात परतला. आता तो माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायात गुंतलेलाही आहे. त्याला त्याच्या कार्यालयातूनच अटक करण्यात आली आहे.

त्याने आपला गुन्हा कबूल केला असून बिटकॉईनच्या माध्यमातून तो पैशाचा व्यवहार करीत असे त्याने सांगितले आहेे. तो डार्कनेटवरून ही खरेदी करीत असे. तो एलएसडी, कोकेन, एमडीएमए, ही द्रव्ये किमात आठ वेळा खरेदी केलेली आहेत. तो याच पाच वर्षापासून त या कामात गुंतला आहे. त्याची गेल्या वर्षी रितुल अग्रवाल याच्याशी काही मध्यस्थांच्या मार्फत ओळख झाली तेव्हापासून तोही अनिशला या व्यवसायात मदत करीत होता. रितुल हा सोनालीगुडा येथील रहिवासी असून तोही एमबीए झालेला आहे. तो हैदराबादेत शिकला आहे. तो आपल्या कुटुंबाचा व्यवसाय करता करता हाही चोरटा धंदा करीत असे. त्यांनी आपला हा धंदा करण्यासाठी नेदरलँडसची निवड केली होती. तिथून ते माल मागवत असत. किती उच्च विद्या विभूषित लोकही कसे या व्यवसायात गुंतले आहेत हे यावरून कळते.

Leave a Comment