राज्यात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त


मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला सरचार्ज रद्द केल्यामुळे राज्यात पेट्रोल प्रतिलिटर ६७ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर १ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहे. या किंमती पुढे पुन्हा वाढतील किंवा तेवढ्याच राहतील. त्यामुळे तुर्तास तरी शेतकऱ्यांच्या ‘तत्वत:’ कर्जमाफीस मान्यता देणाऱ्या भाजप सरकारने वाहनधारकांसाठीही ‘तत्वत:’ अच्छे दिन आणले आहेत असेच म्हणावे लागेल.

७ जुलै रोजी पुण्यात गिरीश बापट यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती. बापट यांनी प्रधान यांच्यासोबतच्या चर्चेत सरचार्ज रद्द करण्याची मागणी केली होती. सरचार्ज रद्द झाल्यास पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होईल. त्यामुळे केंद्र सरकारने जनतेला जीएसटीमुळे होणारा फायदा दिलाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने सरचार्ज रद्द केला आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरात सरचार्ज रद्द झाल्यास कपात होईल. त्यामुळे केंद्र सरकारने जनतेला जीएसटीमुळे होणारा फायदा दिलाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. त्यांची मागणी अखेर मान्य करण्यात आल्यामुळे पेट्रोल ६७ पैसे, डिझेल १ रुपया २४ पैशांनी तर गॅस सिलेंडर ११ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

Leave a Comment