मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईमवर देखील जीएसटीचा परिणाम


मुंबई : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलेल्या आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका आहे. अशातच मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईममध्ये देखील बदल झाला आहे.

दूरसंचार सेवांवर याआधी १५% टॅक्स लागत होता आता तो टॅक्स १८ टक्क्यावर गेला आहे. यामध्ये पोस्टपेड आणि प्री-पेड यूजर्सला आता ३ टक्के अधिक टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच आता १०० रुपयाच्या रिचार्जवर ८२ रुपये टॉकटाईम मिळणार आहे. टॅक्स रेटनुसार जर तुम्ही एक पोस्टपेड यूजर आहात तर आणि जर तुम्हाला ५०० रुपये बिल येत असेल तर त्यावर तुम्हाला १८ टक्के टॅक्स लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ५९० रुपये बिल येणार आहे. प्री-पेड यूजर्ससाठी जर तुम्ही १०० रुपयाचे टॉपअप वाउचरने रिचार्ज केले तर तुम्हाला ८२ रुपये मिळतील. जीएसटी लागू होण्याआधी तुम्हाला ८५ रुपये मिळत होते.

Leave a Comment