शिवाजी महाराजांची बदनामी


अनेकांकडून लिहिला गेलेला आहे आणि इतिहासकारांनी आपापल्या परीने शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्यावर लिखाण केलेले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचे शिवाजी महाराजांवर एवढे प्रेम आहे की त्यांच्याविषयी एखादा जरी वावगा शब्द लिहिला गेला तरी हे मराठी शिवप्रेमी चिडतात आणि त्या वावग्या शब्दाबद्दल लेखकाला पुरावे सादर करता आले नाहीत तर त्याच्या पुस्तकातला तो वावगा उल्लेख काढण्याची मागणी करतात. जेम्स लेन याचे या संबंधातले लिखाण एकेकाळी फार गाजले होते हे सर्वांना माहीत आहे. शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते की नाही यावरही आता सध्या वाद सुरू झालेला आहे.

तथापी, अजून एक वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. जगप्रसिध्द इतिहासकार डॉ. इरफान हबीब यांनी एक पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकात शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह माहिती दिली आहे. या पुस्तकात डॉ. इरफान हबीब यांनी शिवाजी महाराजांचे राज्य हे जमीनदारांचे राज्य होते असे म्हटले आहे. या उलट महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचे म्हणणे आहे त्यांच्या मते शिवाजी महाराज हे जमीनदारांचे पाठीराखे नव्हते तर सामान्य रयतेचे पाठीराखे होते. परंतु डॉ. हबीब त्याच्याशी सहमत नाहीत. शिवाजी महाराजांनी शेतसारा दुप्पट केला होता आणि ते प्रत्येक वेळी शिवी देऊन बोलायचे असेही या पुस्तकात म्हटले आहे. मात्र या मजकुराला दुजोरा देणारा पुरावा सादर केलेला नाही.

हे आक्षेपार्ह मजकूर डॉ. इरफान हबीब यांच्या पुस्तकातून काढून टाकावेत आणि ते काढेपर्यंत पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी सरकारकडे केली आहे. २००० साली ही गोष्ट प्रकाशात आली होती. परंतु कोल्हापूरचे इतिहासाचे अभ्यासक अ. रा. कुलकर्णी यांनी एका मराठी दैनिकात लेख लिहून डॉ. इरफान हबीब यांचे हे उल्लेख कसे चुकीचे आहेत हे दाखवून दिले होते. त्याचवेळी डॉ. कुलकर्णी यांनीसुध्दा पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र महाराष्ट्रातील कॉंग्रेसस आणि राष्ट्रवादीच्या मिश्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. या संबंधात कोल्हापुरातील काही इतिहासप्रेमींनी शिवाजी विद्यापीठाला एक पत्र देऊन विद्यापीठानेच शिवाजी महाराजांची ही बदनामी थांबवावी अशी मागणी केली होती. परंतु शिवाजी विद्यापीठाने अद्याप तरी या संबंधात कसलीही कारवाई केलेली नाही.

Leave a Comment