भारताला जागतिक बँकेकडून मिळाले २५ कोटी डॉलरचे कर्ज


नवी दिल्ली: जागतिक बँकेने भारतातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यासाठी भारताला २५ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले असून भारतीय युवकांना जागतिक बँकेकडून कर्जाच्या रूपात मिळालेल्या रकमेतून अधिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे भारतीय तरूणांना व्यवसयाय करणे, नोकरी मिळवणे तसेच, रोजगार उपलब्ध करून देणे सोपे जाणार आहे. योग्य नियोजन झाल्यास भारताच्या पूढील वाटचालीसाठी या कर्जाचा फायदा होऊ शकतो.

जागतिक बँकेने कर्ज देताना म्हटले आहे की, युवकांना कौशल्यापूर्ण आणि अधिक कुशल बनविण्यासाठी भारत सरकार इच्छुक असल्यामुळे भारताच्या या उपक्रमामुळे भारतात आर्थिक विकास आणि समृद्धी येईल. जगाच्या विकासात भारताचे हे पाऊल महत्त्वाचे योगदान देईन. बँकेने आपल्या प्रतिक्रीयेत असेही म्हटले आहे की, २५ कोटी डॉलर कुशल भारत मिशन परिचलन सीमासाठी बँकेचे निदेशक बोर्डाने मंजूर केले आहेत.

Leave a Comment