सचिन आणि सलमानवर विराटची मात


मुंबई – अभिनेता सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रासारख्या सेलिब्रेटींना मागे टाकत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. विराट कोहलीच्या फॉलोअर्सची फेसबुकवर संख्या ३,५७,२५,७१९ ऐवढी झाली आहे.

याआधी बॉलिवूडचा दबंग खान सलमान सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होता. पण त्यालाही विराटने मागे टाकले आहे. सलमान या यादीत दुसऱ्या स्थानावर, दीपिका पादूकोण तिसऱ्या स्थानावर आणि प्रियंका चोप्रा चौथ्या स्थानी आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

विराटने काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर आता विराटने सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या यादीतही अव्वल स्थान कायम ठेवले आहे. फेसबुकच्या ३,५७,२५,७१९ फॉलोअर्सबरोबरच ट्विटरवर कॅप्टन कोहलीचे १६ दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवर १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment