मार्क झकेरबर्गची सोमालियन निर्वासितांसोबत इफ्तार पार्टी


नवी दिल्ली – जगभरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मुस्लिम बांधवांना देशभरातून ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्गने ईदच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर पोस्ट शेअर केली असून मार्कने फेसबुकवर ईदच्या आदल्या दिवशी मुस्लिम निर्वासितांसोबत इफ्तारचा आनंद घेतानाचा फोटो शेअर केला.

पहिल्यांदाच सोमालियन निर्वासितांसोबत मी इफ्तारचा आनंद घेत आहे, त्यांच्यासोबत रमझानच्या पवित्र महिन्यांचा शेवट इतका आनंदात होईल, असे मला कधीच वाटले नव्हते, असे त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने त्याचबरोबर निर्वासितांचा तिरस्कार करणाऱ्यांसाठी एक उदाहरणही आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

मी एका व्यक्तीला इफ्तारच्या मेजवानीत भेटलो. ज्याने २६ वर्षे निर्वासितांच्या छावणीत घालवली होती. तुला अमेरिकेत आपल्या घरासारखे वाटते का?, मी असे त्या व्यक्तीला विचारले. त्या व्यक्तीने त्यावर विचार करायला लावणारे उत्तर दिले. घर ते असते जिथे तुम्हाला हवे ते करण्याचे आणि हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य असते, असे उत्तर त्या निर्वासिताने दिले. तो निर्वासित होता खरा पण त्याला अमेरिका आपल्या घरासारखीच वाटत होती, कारण अमेरिका प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करते. निर्वासितांचा तिरस्कार करणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी मार्कची ही पोस्ट होती.

Leave a Comment