जिओची ग्राहकांना आणखी एक भेट!


मुंबई: आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने आणखी एक खास भेट दिली असून जिओने ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी होम डिलिव्हरी सेवा सुरु केली आहे. जिओचे सिम आतापर्यंत होम डिलिव्हरीमार्फत मिळत होते. पण यापुढे अवघ्या ९० मिनिटात तुमच्यापर्यंत जिओफाय हॉटस्पॉट डोंगल पोहचू शकणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.

१९९९ रुपये ऐवढी जिओफाय हॉटस्पॉट डोंगलची किंमत आहे. पण तुम्ही तुमचे जुने राउटर किंवा डोंगल एक्सचेंज केले तर तुम्हाला यामध्ये २०१० रुपये किंमतीचा डेटा मिळेल. म्हणजेच तुमचे नवे राउटर फ्री असेल. जिओच्या सिमची देशात ६०० ठिकाणी होम डिलिव्हरी सुरु आहे.

कंपनीने आता आपल्या हॉटस्पॉट डोंगलचीही होम डिलिव्हरी सुरु केली आहे. यासाठी तुम्हाला जिओच्या वेबसाइटवर जाऊन पिनकोड टाकावा लागेल. कारण त्यानुसार तुम्हाला ही डिलिव्हरी होऊ शकते की नाही हे समजणार आहे. नुकतेच ट्रायच्या माय स्पीड अॅपमध्ये जिओला अव्वल क्रमांक मिळाला आहे.

Leave a Comment