ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचा फर्स्टलुक रिलीज


मुंबई: ह्युंदाईने नुकतेच आपल्या नव्या वेरना सेडान कारचे टीझर लाँच केल्यामुळे येत्या आठवड्यातच या कारबाबत कंपनी नेमकी माहिती देण्याची शक्यता असल्यामुळे आता ही कार मारुती सुझुकीच्या डिझायर आणि होंडाच्या अमेझला कार बाजारात टक्कर देणार का हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

ह्युंदाईच्या एलांट्राप्रमाणेच जवळजवळ नव्या वेरना कारचे डिझाइन आहे. यामध्ये ह्युंदाईची कास्केडिंग ग्रिल देण्यात आली आहे. एलांट्राप्रमाणेचा या कारमध्ये देखील जे आकाराच्या जे-टाइम रनिंग एलईडी लाईट देण्यात आली आहे. तसेच यात फॉग लॅप्सही देण्यात आले आहेत. या कारच्या बंपरवर ड्यूल-टोन ट्रिटमेंटसोबत रिफ्लेक्टर्सही देण्यात आले आहेत. नव्या वेरनाची लांबीही वाढण्यात आली आहे. दरम्यान, याच्या इंजिनबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment