डोनाल्ड ट्रम्पची प्रतिमा असलेला लेडीज स्विमसूट


अमेरिकेत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे स्विमिग करणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. बाजार पोहण्यासाठी लागणार्‍या वस्तूंनी बहरला असतानाच मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भोचक मुद्रा असलेले लेडिज स्विमिंग सूटही बाजारात दाखल झाले आहेत. हा स्विमसूट नेटवर व्हायरल झाला आहे.

बिलवेड शर्टस या कंपनीने हा स्विमसूट बाजारात आणला असून त्याची किंमत आहे ४९.४५ डॉलर्स. कंपनीच्या म्हणण्यानुसार महिलांना त्यांचा बांधा अधिक कमनीय दिसावा अशी इच्छा असते, ती हा सूट पूर्ण करेल. शिवाय या स्विमसूट मागचा उद्देश तो वापरण्याला आनंदी ठेवावे असाही आहे. हा स्विमसूट एकदा विकत घेतला की तो बदलता येणार नाही अथवा परत घेतला जाणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment