आयफोन आणि गुगलच्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये बंपर सुट - Majha Paper

आयफोन आणि गुगलच्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये बंपर सुट


मुंबई: देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी सेल सुरु केले असून अमेझॉननंतर आता फ्लिपकार्ट या वेबसाईटनेही आपल्या यूजर्ससाठी #OwnYourDreamPhone सेल सुरू केला आहे. हा सेल आजपासून २४ जूनपर्यंत असणार आहे. आकर्षक सूट, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्टट ईएमआय ऑफरही या सेलमध्ये आहेत.

फ्लिपकार्टच्या #OwnYourDreamPhone या सेलमध्ये सर्व आयफोन व्हेरिएंटवर मोठी सूट देण्यात आली आहे. आयफोन ७ प्लस १२८ जीबीवर तब्बल २२,००० रु. सूट देण्यात आली आहे. ८२००० रु. किंमतीचा हा फोन ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर आयफोन ७च्या ३२ जीबीवर १७००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

आयफोन ६चे १६ जीबी आणि ३२ जीबी व्हेरिएंट देखील या सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३२ जीबी मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये असू शकते. तर आयफोन ६ प्लसची किंमत ४०,९९९ रुपये असणार आहे. आयफोन ५एस १४,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे.

या सेलमध्ये आयफोनशिवाय गुगल पिक्सलवर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. यामध्ये कंपनी ३ हजारपेक्षा जास्त डिस्काउंट देत आहे. याच सेलमध्ये मोटो झेड वर १०,००० रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

Leave a Comment