व्होडाफोन देणार अवघ्या २९ रुपयात अनलिमिटेड डेटा!


मुंबई: आपल्या ग्राहकांसाठी व्होडाफोनने एक नवा प्लान लाँच केला आहे. ‘व्होडाफोन सुपरनाईट’ हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये २९ रुपयात पाच तास अनलिमिटेड ३जी किंवा ४जी डेटा मिळणार आहे.

म्हणजेच या प्लानमध्ये अवघ्या ६ रुपयात तासाभरासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये मिळणारा डेटा तुम्ही रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड वापरु शकता. याबाबत व्होडाफोनने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लान तुम्ही कधीही अॅक्टिव्हेट करु शकता. पण रात्री एकवाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग करता येऊ शकते. सुपरनाईट पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना *444*4# डायल करावे लागेल. याशिवाय रिचार्ज शॉपमधूनही तुम्ही रिचार्ज करु शकतात. याआआधी व्होडाफोनने रमजान ऑफरमध्ये २जी यूजर्ससाठी ५ रुपयात १ तासासाठी अनलिमिटेड डेटा प्लान आणला होता.

Leave a Comment