आजही सर्वात वेगवान सुपर काँम्प्युटर चीनीच


जगातले सर्वाधिक वेगवान व अचूक महासंगणक म्हणून आजही दोन चिनी सुपर काँम्प्युटर्सच कायम राहिले असून जगातील वेगवान महासंगणकांची यादी जर्मनी व यूएसने प्रकाशित केली आहे. या यादीनुसार चीनचे सनवे ताहुलाईट व तिन्हे २ हेच जगातले सर्वात वेगवान असे पहिल्या व दुसर्‍या नंबरचे महासंगणक आहेत. सेमी अॅन्युअल टॉप ५०० सुपर काँम्प्युटरची ही यादी संशोधकांनी तयार केली आहे.

चीनच्या सनवे व तिन्हे नंतर तीन नंबरवर स्विस पिझ डेंट अ्राहे तर अमेरिकन टायटन चौथ्या नंबरवर आहे. सनवे गेल्या जूनपासून टॉपवर असून त्याने तिन्हे २ ला मागे टाकत हे स्थान मिळविले आहे. तिन्हे गेली तीन वर्षे पहिल्या स्थानावर होता. सनवे ताऊलाईटची क्षमता ९३ पेटाफ्लॅक्सचा असून त्याचे प्रोसेसर संपूर्णपणे स्वदेशी म्हणजे मेड इन चायना आहेत.

Leave a Comment